। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील क्रीडा संकुलाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.17 जून रोजी खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व त्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन राज्य व देश पातळीवर त्यांनी आपल्या कौशल्याने आपल्या गावाचा व पर्यायाने देशाचा नावलौकीक वाढवावा यासाठी तालुका व गाव पातळीवर क्रीडा संकुल असणे गरजेचे होते यासाठी वेळोवेळी मागणी केली जात होती. या क्रीडा संकुलासाठी लागणार्या जागेचा प्रश्न बोर्लीपंचतन येथील रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मालकीची तिन एकर जागा विनामुल्य देऊन सोडविला. याप्रसंगी उपविभागीय प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक,अंकिता मयेकर, संदीप वांजळे, सचिन निकम, ज्योती परकर,ग्राम पं.सदस्य, गणपती देवस्थान समितिचे सुशिल पाटील,सुजित पाटील, उदय बापट महंमद मेमन, सुकूमार तोंडलेकर, मंदार तोडणकर,नंदू पाटील, सुचिन किर,दर्शन विचारे व ग्रामस्थ उपस्थित होते.