फसवणूक करुन महिलेला लुटले

। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे परिसरातील सेक्टर 11 येथील एक महिला उडीद डाळ खरेदीकरण्यासाठी बाहेरील पडल्या होत्या. यावेळी अनोळखी इसमाने त्यांना थांबवत उभे एक शेठ गरीब महिलांना साड्या वाटणार आहे. त्यामुळे तुम्हीं अंगावरील सोने काढून द्या नाहीतर साडी मिळणार नाही. असे सांगत त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पसार झाल्याची घटना कामोठे परिसरात घडली आहे. याबाबत त्या महिलेने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version