महिलेचा आढळला मृतदेह

। पनवेल । वार्ताहर ।
एका अनोळखी महिलेचा मृतदेह तालुक्यातील वळवली गावाच्या हद्दीतील बाहेरच्या बाजूस वडाच्या झाडाखाली आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिलेचे अंदाजे वय 60 वर्षे, उंची 5 फूट, रंग काळा सावळा, अंगाने मध्यम, चेहरा उभट असून, अंगावर काळसर गुलाबी रंगाची साडी व दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आहेत. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्‍वर पोलीस ठाणे दूरध्वनी 7219173600 किंवा पो.उपनिरीक्षक निलम जाधव यांच्याशी संपर्क साधा.

Exit mobile version