खांब येथील उड्डाणपुलाचे काम ढासळले

शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया

। कोलाड । प्रतिनिधी ।

मुंबई गोवा महामार्गावरील खांब नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरु असून ते पूर्ण झाले असल्याचे भासवत या मार्गांवरील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरु होणार होती. परंतु ती वाहतूक सुरु होण्याच्या आधी उड्डाणपुलाचे काम ढासळले आहे. यामुळे प्रवाश्यांच्या जीवाचा खेळ मांडण्याबरोबर शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून दरवर्षी नेहमी रस्ता पूर्ण करण्याची डेडलाईन दिली जाते परंतु रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला भोगावा लागत आहे. यावरून रोज मरे त्याला कोण रडे! अशी या महामार्गाची परिस्थिती झाली आहे. खांब नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन कोलाड बाजुकडून नागोठणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. नागोठणे बाजुकडून कोलाड बाजूकडील काम ही पूर्ण झाले आहे. ही वाहतूक काही दिवसांनी सुरु केली जाणार होती. परंतु वाहतूक सुरु होण्याच्या अगोदरच या उड्डाणपुलाची एक बाजु ढासलली यावरून ठेकेदाराने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे. हे लक्षात येते. प्रशासनाचा ठेकेदारावर कसलाच वचक नसल्याने प्रवासी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील खांब बाजारपेठेतील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले परंतु खांबकडून कोलाडकडे जाणारी वाहतूक या उड्डाणपुलावरून सुरु करण्याच्या अगोदर या पुलाचा भाग ढासळला. या ढासळलेल्या भागामुळे बाजूनी जाणार्‍या वाहनचालकांसहित प्रवाशांना मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त भघवना जनतेच्या आहेत.

राकेश महाबळे
वैजीनाथ ग्रामस्थ

Exit mobile version