उरणकरांसाठी खुशखबर! ‘या’ पुलाचे काम लवकरच सुरु होणार

| उरण | वार्ताहर |
गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील चिरनेर ब्रिज हा धोकादायक झाला आहे. या ब्रिजचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम हे तातडीने होणे आवश्यक आहे. पुलाच्या बांधकामास परवानगी मिळालेली असुन ते काम टाटा प्रोजेक्ट लि. ही कंपनी करणार आहे. हा पूल बांधण्याचे काम अंदाजे सहा महिने सुरु राहणार आहे.

या कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याची जागा उपलब्ध नसल्याने चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने चिरनेर फाटा येथे बंद करणे आवश्यक आहे. तरी गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील जुना रेल्वे ब्रिज मार्गे येण्यास व जाण्यास पुर्णतः बंदी करणेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील जुना रेल्वे पूल मार्गे येणा-या वाहनांची वाहतुक पुर्णतः बंदी करण्यात येवुन पर्यायी मार्गाने वळविणेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Exit mobile version