। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील भातसई येथे महादेवीच्या यात्रेला जनसागर उसळला होता. यावेळी हर हर महादेवाच्या गजरात भातसई नगरी दुमदमली होती. रायगड जिल्ह्यातील हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी सर्वप्रथम मंदिरात देवीची आरती घेण्यात आली. सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कृष्णा रटाटे यांना मुख्य गळ लावण्यात आले. लाटेवर अधांतरी गळ लावुन हरहर महादेवचा गजर होताच अधांतरी फिरवण्यात आले. लाटेवर चिंतामणी खरीवले आरुढ झाले होते. यावेळी त्यांच्यासह यशवंत जोशी, भगवान शेळके, संतोष खरीवले, संजय शिंदे, संदीप चौलकर यांना गळ लावण्यात आले होते.