| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिला म्हणून एका 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. सोमवारी संध्याकाळी कामोठे येथे ही घटना घडली आहे. आपल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळळा आहे. या तरुणाला आयफोन घ्यायचा होता. त्याची किंमत 1.5 लाख रुपये होती. त्याच्या वडिलांनी आयफोन घेऊन दिला नाही. त्याच रागातून त्याने त्याने हो टोकाचे पाऊल उचलले. किशोर असे मृत मुलाचे नाव आहे.