| सुकेळी | प्रतिनिधी |
गणेशोत्सवानंतर आता तरुणाईला नवरात्री उत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रीची धुम हळूहळू सर्वत्रच पहायला मिळत आहे. पंरतु, या सगळ्यात सर्वात जास्त मुर्तीकारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असल्याचे चित्र नागोठणे परिसरामध्ये दिसुन येत आहे. देवीच्या मुर्तीची कामे ही अंतिम टप्प्यात आली असुन मुर्तींच्या फिनिशिंगकडे जास्त लक्ष दिले जात आहे.
शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातही नवरात्रीचा उत्सव हा उत्साहात साजरा केला जातो. अनेक मंडळे ही देवीच्या भव्य मुर्तींची प्रतिष्ठापना करत असतात. त्यामुळे अनेक मंडळे आता नवरात्री उत्सवाच्या जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातही तरुणवर्गांचे नवरात्र उत्सवांचे नियोजन सुरू आहेत. ही मंडळे शहरांच्या तुलनेत छोटी असतात. मात्र, उत्साहात कोठेही कमतरता नसते. ग्रामीण भागातही ध्वनिफितीच्या ताळावर रास गरबा जोरदार रंगतो. त्यामुळे सर्वच मंडळांना आता नवरात्रीचे वेध लागले आहेत.
तरुणाईला लागले नवरात्रीचे वेध

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;