नवरात्र मंडळांच्या जोरदार तयारी सुरु
। सुकेळी । वार्ताहर ।
गणेशोत्सवानंतर आता तरुणाईला नवरात्री उत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रीची धुम हळुहळू सर्वत्रच पहायला मिळत आहे. परंतु, या सगळ्यात सर्वात जास्त मुर्तीकारांची घाई दिसत आहे. देवीच्या मुर्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन मुर्तीच्या फिनिशिंगकडे जास्त लक्ष दिले जात आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही नवरात्रीचा उत्सव हा उत्साहात साजरा केला जातो. अनेक मंडळे देवीच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना करत असतात. यामुळे अनेक मंडळे आता नवरात्रीच्या उत्सवाच्या जोरदार तयारीला लागले आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातही तरुणवर्गांचे नवरात्र उत्सवाचे नियोजन सुरू आहेत. ही मंडळे शहरांच्या तुलनेने छोटी असतात, मात्र उत्साहात कोठेही कमतरता नसते. ग्रामीण भागातही ध्वनिफितीच्या ताळावर रास गरबा जोरदार रंगतो. यामुळे सध्या सर्वच मंडळांना आता नवरात्रीचे वेध लागले आहेत.
