तरूणांनी बुझविला महाकाय खड्डा

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उडदवणे येथील रस्त्यावर महाकाय खड्डा पडला होता. येथील तरूणांनी प्रसंगावधान राखून तो खड्डा बुझविला आहे.

शनिवारी सकाळपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अशातच उडदवणे-पालदाड मार्गावर असलेल्या श्रीयुत माळी यांच्या किराणा दुकानासमोर एकाकी पाणी भरायला सुरूवात झाली होती. अशातच तिथे मोठा खड्डा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यातच या खड्ड्याची व्याप्तीही वाढू लागल्याने दोन्हीकडे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. अशा गंभीर परिस्थितीत येथील तरूण मारुती तुपकर, महेश तुपकर, दिनेश कराळे, योगेश शिंदे, नितेश कोल्हटकर, मंगेश भाई, स्वामी कोल्हटकर यांनी पुढाकार घेऊन व मेहनत करून तो महाकाय खड्डा बुझविण्यात आला.

Exit mobile version