धरणाचीवाडीत चोरी

| माणगांव | वार्ताहर |

माणगांव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे.हे चोरटे बंद घरे, कन्स्ट्रक्शन कंपन्यांचे स्टील यार्ड, बंद कन्स्ट्रक्शन साईड अशाप्रकारची वेगवेगळी ठिकाणे लक्ष्य करत आहेत. अशाचप्रकारे इंदापूर विभागातील धरणाची वाडी गावच्या हद्दीतील बंद कंपाउंडमध्ये घुसून अज्ञात चोरट्यानी तब्बल १ लाख ४८ हजारांचे सामान लंपास केले आहे.

माणगाव  पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक २२ एप्रिल ते २७ एप्रिल च्या दरम्यान घटनेतील फिर्यादी आशिष अनंत दळवी यांच्या धरणाचीवाडी येथील कंपाउंडमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी  १ लाख रुपये किंमतीचे लोखंडी ऑफिस कंटेनर, ८ हजार किंमतीचे ऑफिस कामाचे टेबल, ३ हजार किमतीच्या २ ऑफिस व्हील खुर्च्या, १० किंमतीचे गॅस कटर, १ वेल्डिंग मशीन, २ ग्रायंडर, १ हायड्रोलिक पाईप,४ पाने,गाडीचे इंजिन, ५ हजार किंमतीचे एफ सेंटेक्स पोर्टेबल बाथरूम, ४हजार किंमतीचे २० लोखंडी पाईप, १५ हजार किमतीचे निळ्या पांढऱ्या रंगाचे पोर्टेबल बाथरूम, ३ हजार किंमतीचे पत्र्याची शेड आणि लोखंडी पाईप असे एकूण १ लाख ४८ सामान चोरून ते पसार झाले आहेत. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह दर्शन दोडकुळकर हे करीत आहेत.

Exit mobile version