| पनवेल | वार्ताहर |
शहरातील जरीमरी देवी मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तेथील दान पेटीतील रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शहरातील व्हि.के.हायस्कूल रोड येथील जरीमरी देवी मंदिराचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून मंदिरातील दान पेटी लोखंडी रॉडने तोडून त्यामध्ये असलेले जवळपास 3 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक यांनी अधिक शोध घेत असताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपी आकाश चरण (32) रा.पनवेल याला ताब्यात घेतले आहे.