कणकवली येथे चोरी; 14 तोळे सोने लंपास

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

कणकवली येथे चोरट्यांनी सात रूम फोडून रोख रक्कम तसेच, 14 तोळे सोने लंपास केले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कणकवली तालुक्यातील जानवली येथील दीक्षा अपार्टमेंट आणि पीजी ग्रुप या दोन इमारतींमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी दोन्ही इमारतींमधील एकूण सात रूम फोडले असून रोख रकमेसह 14 तोळे सोने लंपास केले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version