गडब येथील एटीएम फोडून रोकड लंपास

। गडब । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील गडब येथील स्टेट बॅकेचे एटीएम फोडून रोकड चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

मुंबई-गोवा हायवेवरील गडब येथील स्टेट बँक एटीएमच्या गाळ्याचे शटर तोडून एटीएम मशीन कटरच्या साह्याने तोडून एटीएममधील 1651100 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.01) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गर्शनाखाली वडखळ पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version