। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील आमटेम गावाजवळ कोकण रेल्वेच्या लाईनजवळ स्री जातीच्या मानवी हाडाचा सांगाडा सापडला आहे. कोकण रेल्लेवरील लाईनमन रेल्वे लाईनची पाहणी करीत असताना आमटेम गावाजवळील रेल्वे लाईनच्या बाजूला स्री जातीची मानवी शरीराची हाडे व कवटी विखुरलेल्या स्थितीत आढळून आली असून, तेथे काळ्या जीर्ण झालेल्या मळकट रंगाची लेगीज, हिरवट मळकट रंगाचा टॉप आढळून आला आहे.
या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई तपास करीत आहेत. याबाबतीत काही माहिती असेल, तर वडखळ पोलीस ठाण्याशी संर्पक करावा, असे आवाहन वडखळ पोलिसांनी केले आहे.