। सुधागड -पाली । वार्ताहर ।
ऐन नवरात्रोत्सवात पाली बाजारपेठेतील पालीवाला कॉप्लेक्समधील तळमजल्यावर असलेले सतीश सिलिमकर यांच्या सतीश फुटवेअर अॅण्ड मोबाईल या दुकानात चोरी झाली. यामध्ये तब्बल 88 हजारांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे.
चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या उजव्या बाजूचे कुलूप फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील नवीन मोबाईल व एक लॅपटॉप असा एकूण 88 हजार किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम.एम.लांगी करीत आहेत.