पनवेलमध्ये चोरी

काऊंटरमधील रक्कम लंपास

शहरातील ठाणा नाका येथील डी-मार्ट रेडी काऊंटर नंबर 4 येथून एका मुलीने रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर ठिकाणी असलेल्या डी-मार्ट रेडी मध्ये एक अनोळखी मुलगी सदर ठिकाणी येवून तीने काऊंटर नंबर 4 मधून साडेसहा हजार रुपयाची रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हिरो सायकलची चोरी

हिरो कंपनीच्या इलेक्ट्रो इसेंशिएना सायकलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील प्रियदर्शनी सोसायटी येथे राहणारे परिक्षित पाटील यांनी त्यांची 8 हजार रुपये किंमतीची सिल्व्हर-ग्रे व हिरव्या पट्ट्या असलेली हिरो कंपनीची इलेक्ट्रो इसेंशिएना सायकल ही जीन्याच्या खाली साखळी लावून ठेवली असता, अज्ञात चोरट्याने सदर सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टोयोटो शोरुममध्ये चोरी

पनवेल जवळील कोळखे गाव येथील वासन टोयोटो शोरुममधून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. वासन टोयोटो शोरुम येथील प्रवेशद्वारच्या काचेच्या दरवाजाला साखळीला लावलेला लोखंडी लॉक अज्ञात चोरट्याने तोडून त्यावाटे आत प्रवेश करून, कॅश काऊंटरवरील खिडकीमधून आत प्रवेश करून, ड्राव्हरमध्ये ठेवलेले जवळपास 33 हजार 290 रुपये एवढी रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सायलेन्सरची चोरी

पनवेल शहरात 40 हजार रुपये सायलेन्सरची चोरी झाल्याची घटना घडली आहे. समीर शेठ (रा.ओंकार सोसायटी, परदेशी आळी) यांनी त्यांची इको गाडी ही राहत असलेल्या बिल्डींगच्या गेटच्या समोर उभी करून ठेवली असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीचा सायलेन्सर ज्याची किंमत जवळपास 40 हजार रुपये इतकी आहे चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version