। पनवेल । वार्ताहर ।
खारघर सेक्टर 10 मधील, साई विल्हा अपार्टमेंटमध्ये अज्ञात इसमाने दिवसाढवळा घरफोडी करून, घरातून सोन्याचे, चांदीचे दागिनेवर रोख रक्कम असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे.
खारघर सेक्टर 10, साईविला अपार्टमेंटमधील रहिवासी प्रवीण कुमार मांगीलाल चौधरी हे घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यादरम्यान अज्ञात इसमाने चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यातून रोख रक्कम, सोन्याचा हार व चांदीचे दागिने असा 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.