सोन्याच्या अंगठीची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठीची चोरी झाल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चिंध्रण येथील अर्चना जगताप या घणसोली ब्लड कॅम्प येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्यांनी हातात असलेली सोन्याची अंगठी प्लॅस्टीकच्या छोट्या डबीमध्ये ठेवून ती डबी बॅगेत ठेवली होती. त्या परत घरी आल्या असता त्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यात त्यांना अंगठी मिळून न आल्याने त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

Exit mobile version