पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर उभी केलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सागर दत्तात्रय कोठारे (24) रा. विंधणे, ता. पनवेल यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही दुचाकी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यालगत पार्क केली होती. त्यानंतर परत आल्यानंतर त्यांची दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे आढळून आले. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे 70 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version