जावटे येथे कॉपर कॉइलची चोरी


। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी पासून 4 कि.मी अंतरावर असलेल्या जावटे गावाच्या पाणी खेचण्याची महावितरणाच्या ट्रान्स्फॉर्मरमधील कॉपर कॉइल अज्ञात भुरट्या चोरट्यांनी चोरली असून या कॉपर कॉइलची किंमत साठ हजार एवढी आहे. या मशीनद्वारे संपूर्ण जावटे गावाला पाणी खेचण्याची योजना होती. नळा द्वारे पाणी खेचून गावाला पाणी मिळायचे मात्र चोरट्यांनी या कॉपर कॉइल वरच डल्ला मारल्यामुळे आता गावाला पाणी कसे मिळणार अशी अवस्था निर्माण झाली असता गावचे पोलीस पाटील वामन हरी शेपोंडे, सामजिक कार्यकर्ते प्रकाश शेपोंडे, तसेच उपसरपंच सुभाष राणे त्याच प्रमाणे सर्व ग्रामस्थांनी त्वरित लक्ष देऊन नवीन कॉपर कॉइल बसविली आणि काम पूर्ववत केले.

Exit mobile version