सुक्या मेव्याची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

चोराने दुकानात प्रवेश करून काजू, बदाम, वेलची, रोख रक्कम असा 16 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. सुशील जयस्वाल हे उलवे येथे राहत असून त्यांचा कळंबोली, सेक्टर 11 येथे गोयल ट्रेंडिंग शॉप आहे. ते दुकानावर आले असता लोखंडी कुलूप कापलेले दिसून आले. आत मध्ये जाऊन पाहणी केली असता काजू, बदाम, वेलची आणि रोख रक्कम दिसून आली नाहीत.

Exit mobile version