सोन्याच्या दागिन्यांची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील तूरमाळे येथे अज्ञात इसमाने घराच्या बेडरूममध्ये कप्प्यांमध्ये ठेवलेल्या बॉक्समधील 406 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनोळखी आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांच्या घरी एअर कंडिशनर सर्विसिंगसाठी दोघेजण आले होते. त्यानंतर ही त्यांची एअरकंडशनर व्यवस्थित होत नसल्याने 19 एप्रिल रोजी ते पुन्हा त्यांच्या घरी आला. एअर कंडिशनर आणि सिलिंगच्या मोकळ्या कप्यामध्ये ठेवलेल्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये केवळ एक फुटाचे अंतर आहे. त्यामुळे एयर कंडीशनर सर्विसिंग करता आलेला अनोळख्या इसमानेच दागिने चोरल्याचा त्यांना संशय आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version