वीस तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील वडवली गावातील वसंत मोतीराम तळपे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. त्यांच्या घरातील कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात वसंत तळपे यांनी 20 तोळ्यांचे दागिने चोरीच्या घटनेची नोंद केली आहे.

वसंत मोतिराम तळपे यांच्या पत्नी नम्रता यांनी घराचा दरवाजा उघडून घरत प्रवेश कल्यावर त्यांना घरातील लोखंडी कपाट उघडले असल्याचे दिसून आले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लॉकर फोडून लंपास केले असल्याचे आढळून आल्यानंतर वसंत तळपे यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून आपल्या घरी चोरी झाली असल्याची तक्रार दिली आहे. तळपे यांच्या भरलोकवस्तीमध्ये असलेल्या घरात घुसून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला असून, त्यात गळ्यातील सोन्याची गंठण, गळ्यातील सोन्याचा हार, सोन्याची साखळी, अंगठ्या, बांगड्या, तसेच कण्यातील कर्णफुले असा साधारण 19 ते 20 तोळ्यांच्या दागिन्यांचीचोरी केली आहे.

Exit mobile version