| पनवेल | वार्ताहर |
खासगी वाहनाने महाड ते पनवेल असा प्रवास करणार्या महिलेच्या बागेतून, तीन अनोळखी इसमांनी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
प्रीती जगताप या खासगी वाहनातून महाड ते पनवेल असा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान प्रीती यांनी बॅग मागील बाजूस ठेवली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही सहप्रवासी प्रवास करत होते. पनवेलला उतरल्यावर प्रीती यांनी बॅग तपासली असता त्यांना सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळे दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रीती यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या बॅगेतून सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, लक्ष्मीहार, चैन, कानातील साखळी, वेल, दोन सोन्याच्या अंगठ्या, वाळे, कमरेची साखळी, कडा, व घड्याळ असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.






