दागिन्याची चोरी

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर मुर्बी गाव येथील सेक्टर 19 येथे राहणारे सचिन प्रकाश लोणशीकर हे बहिणीकडे लग्नाचा वाढदिवस असल्याने ते त्यांची पत्नी व आई असे चालत हॉटेलला जाण्यासाठी पायी चालत जात असताना त्यांच्या आईच्या जवळ दोन इसम आले व त्यांनी आईच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याची माळ असे अंदाजे पावणे चार तोळे वजनाचे दागिने जबरीने खेचून ते मोटरसायकल वरून पळून गेले. केटीएम मोटरसायकलवरील दोन अनोळखी ईसम आले होते. त्यानी जबरीने दागिणे खेचून दुखापत करून ते मुर्बी गावच्या दिशेने मोटरसायकल वरून पळून गेले. याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version