| पनवेल | प्रतिनिधी |
तक्का येथील स्टोअर रूममधील एक लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी चोरांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. के मॉल, तक्का या ठिकाणी निलसिद्धी लाईफ स्पेस या नावाने कन्स्ट्रक्शनचे काम चालू होणार आहे. या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे साहित्य ठेवण्यासाठी पत्रा मारून स्टोअर रूम बनवले आहेत. तेथे बांधकामासाठी साहित्य ठेवले होते. स्टोअर रूमचे कडी कोयंडा तोडून चोरांनी आतील साहित्याची चोरी केली.