| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने खारघरमध्ये तीन वाहनांचे, तर तळोजा येथे एका कारचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे खारघर आणि तळोजा परिसरात झाडे उन्मळून पडणे, तसेच वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे गायत्री हेरिटेज सोसायटी आणि उद्यानाच्या भिंतीलगत असलेली झाडे कोसळून जवळपास पाच कारचे मोठे नुकसान झाले आहे; तर तळोजा फेज एक येथील गामी सोसायटीसमोरील रस्त्यावर उभा असलेल्या वाहनावर एक झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.