भीरा आदिवासीवाडीत सत्तर हजारांची चोरी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील भिरा आदिवासीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतची फिर्याद जानु लक्ष्मण पवार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी सोनू प्रकाश पवार यास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सोन्याचे गंथन, नेकलेस, कानातील जोड, 12 सोन्याचे मणी आणि रोख रक्कम 16 हजार रुपये असा एकूण 71 हजार 900 रुपयांचा ऐवज त्याने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version