एटीएम फोडून वीस लाखांची चोरी

| बुलढाणा | वृत्तसंस्था |

बुलढाणा जिल्ह्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या  चोरीमध्ये आज्ञातांनी एटीएममधून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे.

आज रविवारी (दि. 10) पहाटे 4 वाजताच्या सुमारास  या चोरीच्या घटनेतील अज्ञात आरोपी एका आलिशान कारमधून आले असून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने गावातील नागरिक जागे झाले आणि त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळ ठोकला. या घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे. 

Exit mobile version