| पनवेल | प्रतिनिधी |
घरी काम करणार्या महिलेने घराचा दरवाजा चावीच्या सहाय्याने उघडून सोन्याची अंगठी आणि अमेरिकन डॉलर असा 62 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या महिलेविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर 27, खारघर येथील चंदना शर्मा यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटात सोन्याची अंगठी आणि अमेरिकन डॉलर ठेवले होते. त्यांच्या घरी काम करणार्या महिलेने त्यांच्या पश्चात शेजार्यांकडून चावी घेऊन झाडांना पाणी घालण्यासाठी आली व तिने सोन्याची अंगठी आणि अमेरिकन डॉलर चोरून नेले.