| पनवेल | वार्ताहर |
गाडीची काच फोडून गाडीच्या आतील मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील भोकरपाडा परिसरात घडली आहे. राजीवकुमार श्रीवास्तव (52) यांनी त्यांची गाडी जुना मुंबई-पुणे हायवेच्या बाजूला रोडच्या बाजूला भोकरपाडा येथे उभी ठेवली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या पाठीमागील उजव्या बाजूची काच फोडून गाडीच्या आतमध्ये असलेले ब्राऊन रंगाची बॅग, रोख रक्कम, डायरी, चावी, पेन, पासबूक, मोबाईल फोन व इतर महत्वाची कागदपत्रे तसेच स्मार्ट वॉच असा मिळून जवळपास 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.