| पनवेल | वार्ताहर |
व्हिसाची मुदत संपली असतानाही तळोजात वास्तव्य करणार्या नायजेरियन नागरिकाला तळोजा पोलिसांनी अटक केली. तळोजा पाचनंद येथील सेक्टर- 26 मधील स्प्रिंगवूड इमारतीमध्ये 43 वर्षीय ओझोमबेची फॅबीयन हा राहत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तो राहत असलेल्या सदनिकेत जाऊन त्याची चौकशी केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.