| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथे राहत असलेल्या विनोदवीर प्रणित मोरे याच्यावर सोलापूर येथे 2 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतर शुक्रवारी 7 फेब्रुवारी खारघर पोलीस ठाण्यात प्रणितने दिलेल्या तक्रारीनंतर 10 ते 12 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा सोलापूर येथील पोलीसांकडे वर्ग केला. सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली.
2 फेब्रुवारी सायंकाळी पावणेसहा वाजता सोलापूर येथील सदर बाजार येथील 24 के क्राफ्ट ब्रुंझ रेस्ट्रॉरन्टमध्ये प्रणित मोरे याच्या प्रयोगाची तिकीटे खरेदी करुन मारहाण करणारी मंडळी या हॉटेलात प्रेक्षक बनून शिरली. त्याच दिवशी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर सोलापूर पोलिसांना तो वर्ग करण्यात आला. प्रणितने दिलेल्या तक्रारीमध्ये तन्वीर शेख आणि कौशल शिंदे यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे म्हटले होते. अभिनेता वीर पहारिया याचे प्रणीतने हास्य प्रयोगातून विडंबन करुन त्याची पोस्ट समाजमाध्यमांवर केल्याचा राग संशयित आरोपींच्या मनात असल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे तपासात समोर येत आहे.