| कोल्हापूर | प्रतिनिधी |
पंतप्रधानांवर बोलल्यावर देशद्रोहाचा गुन्हा होत असेल तर मुख्यमंत्र्यांवरही कोणी बोलू नये, असा रोखठोक इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले होते राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी सामंत म्हणाले, मराज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्यावर निषेधाचे ठराव होऊ नयेत, अशी भूमिका मी घेतली. तशा सूचना विद्यापीठांना दिल्या. पंतप्रधानांवर कोणी बोलले तर लगेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यावरही कोणी बोलू नये. रावसाहेब दानवे यांच्या भूमिका काय आहेत, हे सर्वांना माहीत आहे. शेतकर्यांबद्दल ते काय बोलले, याचीही नागरिकांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर खुलासा देणे योग्य होणार नाही.फ ते म्हणाले, मसंवर्गनिहाय प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडे आहे. राज्यात प्राध्यापक भरती सुरू आहे. ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले होते. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांचे नुकसान होणार नाही. ते परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.