अलिबागसह 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

रायगड जिल्ह्यात 29 रुग्ण; शुन्य मृत्यू
9 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 27 डिसेेंबर रोजी कोरोनाच्या 29 नव्या रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 16, पनवेल ग्रामीण 4, उरण 4, पेण 2, रोहा 1, महाड 2, असे 29 रुग्ण आढळले. तसेच खालापूर, मुरुड, कर्जत, अलिबाग, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 697 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 794 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 587 वर गेला आहे. सद्यस्थितीत 316 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version