माढ्याच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

बाबासाहेब देशमुख पवारांच्या भेटीला

| मुंबई | प्रतिनिधी |

भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बुधवारी (दि. 3) मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर आज (दि. 4) एप्रिल दुसर्‍या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे माढ्याबाबत शरद पवार काय निर्णय घेणार? याची उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडीकडून माढ्याच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

धैर्यशील मोहिते-पाटील यांचा तुतारी हाती घेण्याचा कोणताच ठोस निर्णय झाला नाही. यातच डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. माढा लोकसभेची जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडावी, अशी मागणी डॉ. देशमुख यांनी पवार यांच्याकडे केली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी माढा लढविण्याचे संकेत दिले आहेत. परंतु, या मतदारसंघात मोहिते-पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माढ्याबाबत शरद पवार कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच गुरुवारी (दि. 4) रोजी शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन माढ्याची जागा शेतकरी कामगार पक्षासाठी सोडावी, अशी मागणी केली आहे.

या मतदारसंघातून डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील असलेली परिस्थितीचा आढावाही घेतला. माढा लोकसभा मतदार संघ हा परंपरागत पुरोगामी विचारसरणीचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील जनता ही पुरोगामी विचारधारा जोपासणारी असून जर शेतकरी कामगार पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आघाडीच्या माध्यमातून दिली तर विजय निश्‍चित होईल, असा विश्‍वासही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पवारांना दिला.

शेकापची दीड लाख मते
यापूर्वी रायगड, धाराशिव या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते. त्यांचे कार्य सुद्धा लोकाभिमुख होते. माढा लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मते आहेत. डॉ. अनिकेत देशमुख यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिली तर या मतदानाचा फायदा होईल. या भेटीवेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते.
Exit mobile version