संपकाळात विर्द्थांचे नुकसान होणार नाही

| वेणगाव । वार्ताहर ।
आम्ही सर्व शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांचा नेहमी विचार करत आलेलो आहोत, विद्यार्थी हे आम्हास सर्व शिक्षकांचे दैवत आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे संप काळात कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी नक्कीच घेणार आहोत, असे शिक्षक संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोअर कमिटीचे अभिनव शाळेतील शिक्षकांनी अशी ग्वाही दिली. सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मंगळवार (14) बेमुदत संप पुकारला असून या संपला पाठिंबा म्हणून शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने कर्जत तहसील दारांना निवेदन देण्यात आले.

भावी भविष्य घडवणार्‍या कर्मचार्‍यांचा शासनाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन, कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मांगणीचे निवेदन शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने कर्जत तहसिदारांना देण्यात आले. यावेळी योगेशवर निकम, विजय मोरे, संजय दिसले, चंद्रकांत जाधव, दया हजारे, जयमाला जांभळे, उदय सानप, अशोक तुपे, राजेंद्र महाजन, संजय खडे, संतोष देशमुख, जगदीश जाधव, सचिन मेहरे आदि शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version