‘या’ संघांना करावे लागणार प्लेऑफसाठी नियोजन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 मध्ये जवळपास अर्धा टप्पा संपला आहे. जसजसे सामने होत आहेत, तसतसे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनत आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. असे अनेक संघ आहेत ज्यांचा खेळ पाहता त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर काही संघांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

1. राजस्थान रॉयल्सः- राजस्थान रॉयल्स संघाने जवळपास प्लेऑफमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्याकडे 7 सामन्यांतून 12 गुण आहेत आणि त्यांना उर्वरित 7 पैकी फक्त 3 सामने जिंकायचे आहेत.
 
2. कोलकाता नाइट रायडर्सः- केकेआर संघही प्लेऑफमध्ये जाण्याचा प्रबळ दावेदार आहे. संघाचे सध्या 6 सामन्यांतून 8 गुण आहेत. त्यांना आणखी किमान चार सामने जिंकावे लागतील किंवा उर्वरित आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकावे लागतील.
 
3. चेन्नई सुपर किंग्जः- पॉइंट टेबलमध्ये सीएसके तिसर्‍या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांनापण त्यांच्या उर्वरित 7 पैकी किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील. आता त्यांचे सात सामन्यांत 8 गुण आहेत.
 
4. सनराईजर्स हैदराबादः- पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. चारमध्ये जाण्यासाठी त्यांनापण त्यांच्या उर्वरित आठपैकी किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील.
 
5. लखनौ सुपर जायंट्सः- केएल राहुलच्या लखनौचे सध्या आठ गुण आहेत, पण त्यांंचा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांनापण टॉप चारमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 7 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. चार सामने जिंकले तर त्यानंतर चर्चा नेट रनरेटची होईल.
 
6. दिल्ली कॅपिटल्सः- पहिल्या सलग दोन पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने चांगले पुनरागमन केले. आता संघ 7 सामन्यांत 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना आणखी 5 सामने जिंकावे लागतील आणि नेट रनरेटही चांगला राखावा लागेल.
 
7. मुंबई इंडियन्सः- सात सामन्यांत 6 गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानावर आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना आणखी किमान 6 सामने जिंकावे लागतील. त्यांनी 5 सामने जिंकल्यास नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल.
 
8. गुजरात टायटन्सः- आठव्या स्थानावर 6 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना उर्वरित 7 पैकी किमान 6 सामने जिंकावे लागतील. यासोबत नेट रनरेटही चांगला राखावा लागेल.
 
9. पंजाब किंग्जः- पंजाब किंग्जने आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना आता उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. एकही सामना हरला तरी नेट रनरेट इतर संघांपेक्षा चांगली असावी लागेल.
 
10. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूः- आरसीबीचा संघ आता सध्या तळाशी आहे. त्याने आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना उर्वरित सात सामने जिंकावे लागतील आणि नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. एकही सामना गमावल्यास ते बाहेर जातील.
Exit mobile version