सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

चोरी करुन पळताना करूळ नाक्यावर जेरबंद
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
ओरोस येथे कारमधील रोकड घेवुन पलायन करणार्‍या पाच चोरट्यांना वैभववाडी पोलीसांनी पाठलाग करून करूळ तपासणी नाक्यावर जेरबंद केल आहेे. पकडण्यात आलेले सर्व चोरटे सराईत असुन ते घाटकोपर येथील आहे.
संशयित चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर 56 हजारांच्या रोखडसह गोव्यात चोरी करून आणलेले 29 स्मार्ट फोन पोलीसांनी जप्त केले आहेत. वर्षारंभी पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. संशयित चोरट्यांना अधिक तपासाकरीता जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ओरोस येथील पेट्रोल पंपासमोर उभी असलेल्या कारमधील 57 हजार रूपये घेवुन पाच चोरट्याने कणकवलीच्या दिशेने पलायन केले. हा प्रकार आज ता.1 सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला होता. ही माहीती पोलीस नियत्रंण कक्षाकडुन जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली. त्याप्रमाणे वैभववाडी पोलीस ठाण्याला ही माहीती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी करूळ तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीसांना घटनेची माहीती देत सतर्क केले.
याचवेळी वैभववाडी पोलीसांनी संभाजी चौकात ये-जा करणार्‍या वाहनांवर पाळत ठेवली. दरम्यान साडे आठ वाजण्याच्या सुमारास नियत्रंण कक्षाकडुन सांगीतलेल्या वर्णनाची कार संभाजी चौकात आली.पोलीसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतु ती न थांबता वेगाने कोल्हापुरच्या दिशेने जात होती. त्यामुळे पोलीसांना संशय आला.
पोलीसांनी तपासणी नाक्यावरील पोलीसांना माहीती दिल्यानंतर पोलीसांनी संपुर्ण रस्त्यावर बॅरिकेटस लावले. करूळ तपासणी नाक्यापर्यत पोलीसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. तेथे ती गाडी थांबली. गाडीतील पाचही जणांना पोलीसांनी ताब्यात घेत गाडीची तपासणी करण्यास सुरूवात केली.तपासणीदरम्यान पोलीसांना 57 हजारांची रोखड मिळाली.
याशिवाय चोरट्यांकडे 29 स्मार्ट फोन आढळुन आले. यातील काही फोनची किमंत 1 लाख पेक्षा अधिक आहे.हे पाचही चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड होत आहे. ते सर्व घाटकोपर मुंबई येथील आहे. चोरट्यांकडे सापडलेली रोखड ओरोस येथील आहे. परंतु चोरट्यांनी कोणत्या मोबाईल दुकानावर डल्ला मारला याचा तपास पोलीस करीत आहेत. ही चोरी गोव्यात त्यांनी केल्याचा पोलीसांचा संशय आहे.

Exit mobile version