दिघोडे गावात चोरांचा शिरकाव

| उरण | वार्ताहर |

पोलीस यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कामाला लागली आहे. त्याचा फायदा उठवत अज्ञात चोरांनी दिघोडे गावात शुक्रवारी (दि.26) रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत शिरकाव केला. मात्र, रहिवाशांच्या सावधगिरीमुळे चोरांना पळता भुई थोडी झाली आहे.

उरण तालुक्यात या अगोदर जासई, धुतूम, चिरनेर, कळंबुसरेसह इतर गावात चोरांनी हैदोस घातला होता. त्यामुळे रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत होते. रहिवाशांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला असता, उरण पोलिसांना काही चोरांना बेड्या ठोकण्यास यश आले. सध्या लोकसभा निवडणुकीबरोबर लग्न सोहळ्याची धामधूम सुरू असल्याचा फायदा उठवत रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अज्ञात चोरांनी दिघोडे गाव शिरकाव केल्याची घटना घडली. मात्र, रहिवाशांच्या सावधगिरीमुळे चोरांना पळता भुई थोडी झाली आहे.

Exit mobile version