दिवाळी हंगामात मुरुड कोळीबांधव जोरात;30 लाखाची उलाढाल

पर्यटकांची कोळंबी, सोडे खरेदीला पसंती
। मुरुड । वार्ताहर ।
मुरुडकरांसाठी यंदाचा दिवाळी हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला गेला आहे.दिवाळीच्या धामधूमीतच पर्यटकांकडून कोळंबी,सोडे खरेदी जोरात झाली असून,सुमारे 30 लाखांची उलाढाल या काळात झाल्याचे मच्छिमार बांधवांकडून सांगण्यात आले.

मुरुडच्या अर्थकारण या दिवाळी हंगामावर अवलंबून असते. त्यामुळे सुक्या मासळीला मागणी वाढली आहे , ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई , हलवा ,बॉबील .अंबाडी सुकट ,पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रेमात सुकवली व दिवाळीसाठी साठवली.

पर्यटकांची चांगली साथ मिळाल्याने साठवलेला सगळं माल संपला.कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे, कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे की, मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी कॉक्रीटचे ग्राउंड पाहिजे .जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते ,व मासळीचा दर्जा उत्तम होतो.

कोळंबी सोडे – 2100 रुपये किलो
सुके बॉबील – 100 रुपयाचे 50
सुकी सुरमई 1 – 400
अंबाडी सुकट- 400 किलो

पूर्वी दिवाळी हंगामात 50 लाखाहून अधीक उलाढाल होत असे. आत पर्यटक संख्या कमी झाल्याने अजूनही मंदीची लाट आहे .सरकारने कोळी बांधवाच्या सवलती बंद केल्याने कोळी कुटुंब मासेमारी सोडून इतर कामधंदे करत आहेत .ह्याकडे कोणीतरी लक्ष देण्याची गरज आहे

प्रकाश सरपाटील,मच्छिमार
Exit mobile version