यंदा अलिबागमध्ये लागणार दही हंडीचा थरार


शेकापच्या मानाच्या दहीहंडीची नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली घोषणा
अलिबाग विशेष प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्यात नावाजली जाणारी अलिबाग शहरात शेकापक्षातरफे साजरी होणारी दही हंडी दोन वर्षांच्या खंडित झाल्या नंतर यंदा पुन्हा त्याच जोमाने साजरी केली जाणार आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी याबाबतची घोषणा केली.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे
गेल्या दोन वर्षांपासून अलिबागमधील दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. 19 ऑगस्ट रोजी गोपाळकाल्यानिमित्त अलिबागमधील शेतकरी भवनसमोर हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सव स्पर्धेचे स्वरूप तालुकास्तरीय असून अटींचे पालन करणाऱ्या गोविंदा पथकाला प्रवेश देण्यात येणार आहे.

Exit mobile version