यंदाची आयपीएल रंगतदार होणार

नवीन नियम येणार; गोलंदाज अंपायरला फायदा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचे जेतेपद पटकवण्यासाठी 10 संघांमध्ये लढत होणार आहे. मोहम्मद शमीसारखा प्रतिभावान गोलंदाज आणि जेसन रॉयसारखा स्फोटक फलंदाज यासह अनेक खेळाडू यावेळेस विविध कारणांमुळे आयपीएलमध्ये खेळणार नसले तरी काही नवीन नियमांमुळे 2024 मध्ये होणारी ही स्पर्धा विशेष होणार आहे.

आयपीएल 2024 मध्ये आणखी एक नवीन नियम असा असेल की आता डीआरएस ऐवजी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम वापरली जाईल. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आता मैदानात 8 हॉक-आय कॅमेरे बसवले जातील, जे अधिक अचूक निर्णय घेण्यास मदत करतील. आता टीव्ही अंपायर त्याच खोलीत बसणार आहे जिथे दोन हॉक-आय ऑपरेटर बसलेले असतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्टिंग डायरेक्टर टीव्ही अम्पायर आणि हॉक-आय ऑपरेटर यांच्यातील संपर्क म्हणून काम करत असतात. परंतु आता हॉक-आय कॅमेर्‍यातून काढलेली छायाचित्रे केवळ टीव्ही अंपायरसमोर सादर केली जाणार आहे.

स्मार्ट रिप्ले सिस्टीम टीव्ही अंपायरला स्प्लिट-स्क्रीन प्रतिमांसह अधिक व्हिज्युअल्सचा संदर्भ देण्याची परवानगी देईल. सीमारेषेवरील पहिल्या क्षेत्ररक्षकाने हवेत घेतलेल्या रिले कॅचचे उदाहरणासह सांगता येईल, पूर्वी प्रसारक बॉल पकडल्याच्या अचूक क्षणी क्षेत्ररक्षकाच्या पाय आणि हातांची स्प्लिट स्क्रीन एकाच वेळी दाखवू शकत नव्हते. नवीन प्रणाली अंतर्गत, या दोन्ही फुटेजसह स्प्लिट स्क्रीन अंपायरला जेव्हा चेंडू पकडला गेला किंवा सोडला गेला तेव्हा दाखवू शकतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्‍या 20 सामन्यात एक गोलंदाज एका षटकांत फक्त एक बाउन्सर टाकू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्येही असे होत होते, परंतु 2024 च्या हंगामात हा नियम बदलण्यात आला आहे. आता गोलंदाज एका षटकात 2 बाऊन्सर चेंडू टाकू शकतील. यापूर्वी, हा नियम भारताच्या टी-20 देशांतर्गत स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला आहे. याचा गोलंदाजांना फायदा होणार आहे.
22 मार्चला पहिला सामना
22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिली लढत होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली देखील संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
Exit mobile version