यंदाचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नुकतेच यंदाचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात वंदना सुर्वे, देविका पाबेकर, सारा वर्तक, प्राची देवळे व प्रियांका घरत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवारी (दि.7) सकाळी 10.00 वाजता अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात पार पडणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version