मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कोरोना काळातल्या परिस्थितीचा विचार करता शाळा बंद असल्यामुळे शिक्षण थांबता कामा नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केली. शासनानेच तशी सूचना केली.
आता सरकार काही तरी धोरणं आणतंय म्हणजे त्याच्या सोबतच त्याचे फायदे आणि समस्या दोन्हीही आल्यात. ऑनलाईन एज्युकेशन पद्धतीमुळे शिक्षण प्रक्रिया तर सुरू राहिली परंतु मात्र याबाबत शिक्षण, विद्यार्थी आणि पालक प्रचंड गोंधळून गेले आहेत.
बरं हि समस्या इथेच संपत नाही तर या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सर्वात मोठं संकट आलंय त्या मुला-मुलींवर जे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधनं नाहीत. ज्याच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते त्यांना हे मोबाईल, काम्पुटर सारख्या साधनांची उपलब्धता कुठून होणार. मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असल्यास मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा उपलब्ध असणं अनिवार्य झालं आणि हे ज्यांच्याकडे ही सगळी साधनं आहेत त्यांच्या ऑनलाईन शाळा भरल्या आणि ज्यांच्याकडे नाहीत ते यापासून बाजूला सारले गेले.
हे शैक्षणिक संकट जसं संपूर्ण जगावर ओढवलं तसंच धारावीवरही ओढवलं.
अगदी धारावीमधले दाटीवाटीच्या वस्तीतल्या सोशल डिस्टंसिंगपासून ते कोरोनाग्रस्तांच्या आकाड्यांपर्यंतची परिस्थीती संपूर्ण देशाला माहिती आहे. तिथे आलेले हे ऑनलाईन शिक्षणाचे संकट इतरांपेक्षा कैक पटीने गंभीर आहे. धारावी लॉकडाऊन मध्ये अक्षरशः होरपळून निघाली आहे. आता हळूहळू सगळचं जग यातून सावरतंय, थोड्या बहुत प्रमाणात शहरं सुरू झालीत. त्याप्रमाणे आता धारावीही सावरते आहे. परंतु पुढचे प्रश्न आ वासून समोर आहेत. तिथे प्रत्येक घरांत एकच चिंता सतावतेय आता पुढे काय? कित्येक मदतीचे हातही आले आहेत. त्यात एक तरूणी आम्हाला भेटली,
तिचे नाव साम्या कोरडे.
साम्या मुळची मुंबईची. शिक्षण तर सुरूच आहे सोबतच ती काही संस्थाना हाताशी धरून धारावी सारख्या ठिकाणी काही लोकोपयोगी उपक्रम राबवतेय, कॉलेजवयीन हि मुलगी इतक्या कमी वयात वस्तीपातळीवर कार्यरत आहे. तिच्या वयातील मुल-मुली हे वेगळ्याच जगात वावरतात त्याचं वयात हि तरूणी वस्तीतल्या लोकांसाठी. लोकासाठी काही करू पाहतेय, धडपडतेय.. तिच्या या धडपड्या कृतीत तिची साथ देत आहेत काही संस्था.
धारावीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर Centre For Transforming India या संस्थेने Dharavi Foundation आणि साम्या या तरूणीच्या सहकार्याने धारावीतील मुलांचा ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे.
उपक्रमाचं नावं आहे School On Tab
1 जुलै रोजी या उपक्रमाला सुरूवात झाली. School On Tab या उपक्रमा अंतर्गत धारावीतील तब्बल 500 पेक्षा अधिक गरजू आणि होतकरू मुलांयना शिक्षणासाठी मोबाईल टॅब उपलब्ध करून देण्याचं कौतुकास्पद काम त्यांनी केलंय.
साम्याने सांगितले की, ‘धारावीमधील नाईक नगर, राजीव गांधी नगर, भारतीय चाळ या भागातील 50 मुलांना टॅब देऊन या उपक्रमाला सुरूवात खर्या अर्थाने सुरूवात केली. पुढील विद्यार्थी निवडण्यासाठी धारावीच्या इतर भागांतही याबाबतीत सर्वे चे काम सुरू आहे. या मागचा उद्देश हाच आहे की, उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचणे आहे.’
टॅब वितरणाच्या या कार्यक्रमात त्या-त्या भागातील प्रमख महिल्यांच्या हस्ते सर्व टॅबस् वाटण्यात आले. शिक्षणासाठी लागणार्या साधनांच्या अनुपलब्धतेस सोबतच धारावीवासी सध्या अनेक आर्थिक संकटांना तोंड देत आहेत.
त्यातलं आणखी एक संकट म्हणजे लॉकडाऊनमुळे आर्थिक कमाई नाही. त्यात मुलांच्या शाळेची फी भरता येत नाही. फी मध्ये सवलत मिळत नाही, फी नाही तर ऑनलाईन वर्गात प्रवेश मिळत नाही. फी सक्ती, ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारणे या समस्या या ऑनलाईन शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र मा.वर्षाताई गायकवाड यांनी जाहीर केलेल्या ऑनलाईन शैक्षणिक निर्देशांची प्रशासनाकडून अमंलबजावणी शून्य आहे.
थोडक्यात हे निर्देश म्हणजे, शाळांनी पालकांना फी भरण्याची सक्ती करू नये, फी मध्ये शुल्य वाढ करू नये, फीच्या अपूर्तेमुळे मुलांना वर्गात प्रवेश नाकारू नये. शासनाच्या या निर्देशांना सुद्धा शाळा न जुमानता विद्यार्थी आणि पालकांची फीस आणि इतर कारणांवरून आर्थिक पिळवणूक करत आहेत. परंतु साम्य सारख्या संवेदनशील तरूणींनी मदत करू पाहणार्या संस्था आणि गरजू विद्यार्थ्यांमधल्या दुवा साधला पाहिजे, जे कि साम्य ते अगदी योग्यप्रकारे करतेय. ह्या घटकांमधील आर्थिक, सामाजिक दुरी कमी करू पाहतेय. सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधित्व करू पाहणार्या तरूणींनी साम्य च्या या उपक्रमांचा नक्कीच आदर्श घ्यावा.
आजच्या काळात मोबाईल टॅब हे ऑनलाईन शिक्षण अद्यावत आणि सुकर करण्यासाठीचं विद्यार्थ्यांच्या हक्काचं साधन आहे आणि हे हक्काचं साधन Centre For Transforming India साम्याच्या मदतीने त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यत पोहचवत आहेत. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळावं, आणि कुणीही त्यापासून वंचित राहू नये यासाठी ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत.