महापौर कार्यालय, विमानतळासह महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील महापौर कार्यालयासह पाच महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 10.12 वाजता हा मेल प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. महापौर कार्यालय, बँक, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
धमकीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे महापौर कार्यालयातील नियमित कामकाज सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे तिसऱ्यांदा धमकीचा मेल आल्याने पोलिसांकडून मेलचा स्रोत आणि धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
