। पनवेल । वार्ताहर ।
आयफोनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने 600 आयफोन खरेदीच्या ऑर्डरमध्ये झालेल्या फसवणुकीत 2 कोटी 75 लाख रुपये गमावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. याबाबत चार जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहरातील 49 वर्षीय व्यापारी विशाल ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. ऑगस्ट महिन्यात संबंधित व्यापाऱ्याने 600 मोबाइल फोन निर्यातीकरिता ऑर्डर दिली होती. या आयफोनची किंमत 2 कोटी 75 लाख 57 हजार एवढी असून, संबंधित व्यापाऱ्याने कंपनीला रक्कम दिल्यानंतर ही मोबाइल फोन मिळत नसल्याने व्यापाऱ्याने दिलेल्या रकमेचा परतावा मागितला. यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने व्यापाऱ्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी राजस्थान राज्यातील चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आयफोनच्या खरेदीत पावणेतीन कोटींची फसवणूक
