| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इराणकडून संयुक्त अरब अमिराती वर करण्यात आलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. फुजैराह येथील पेट्रोलियम औद्योगिक परिसराला लक्ष्य करण्यात आले असून, या हल्ल्यानंतर मोठी आग लागली. फुजैराह येथे झालेल्या हल्ल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यूएईच्या संरक्षण यंत्रणेने तात्काळ प्रत्युत्तर देत एअर डिफेन्स प्रणाली सक्रिय केली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणकडून चार मिसाइल डागण्यात आले होते. त्यापैकी तीन यशस्वीरित्या अडवण्यात आली, तर एक समुद्रात कोसळली. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणच्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी
