रिक्षावर झाड कोसळून तिघांचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे भलं मोठं झाड रस्त्याने जाणार्‍या एका रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षाचा संपूर्णपणे चेंदामेंदा होऊन रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी (दि. 06) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

चिंचपाडा परिसरात रिक्षावर गुलमोहराचे भले मोठे झाड कोसळून प्रवासी रिक्षात अडकले असल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह, पोलीस यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत रिक्षा चालकासह दोन्ही वृद्ध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली. लता राउत, तुकाराम ठेगडे असे मृत प्रवाशांचे नाव असून उमाशंकर वर्मा असे रिक्षाचालकाचे नाव आहे. हे तिघेही चिंचपाडा परिसरात राहत होते.

Exit mobile version